गरोदर राहिले ही माझी चूकच; भारती सिंगचं `त्यांना` सडेतोड उत्तर
भारती सिंगचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत
मुंबई : कॉमेडियन भारती सिंगने काही दिवसांपासून गुड न्यूज शेअर केली. भारतीने पती हर्ष लिंबाचियासोबत एक मजेदार व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तिला कलाकारांपासून ते अगदी चाहत्यांसोबत सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या. भारती सिंगने काही दिवसांपूर्वी वजन कमी केल्याची चर्चा देखील झाली. याच कारणामुळे तिने वजन कमी केल्याचं म्हटलं जात आहे.
गरोदर असल्याची गु़ड न्यूज समजताच तिने कामातून थोडी विश्रांती घेतली. पण पुन्हा ती आपल्या कामावर रुजू झाली आहे. आता तिचा एक गाडीतला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
भारती सिंग एका कारमध्ये बसली आहे. पापाराझी आणि मीडियाने भारतीला घेरलं आहे. एका शुटिंग दरम्यान ती घराबाहेर पडली होती. तेव्हा मीडियाने तिला गराडा घातला. मग काय भारती आपल्या स्वभावानुसार, मस्करी करताना दिसली.
पापाराझीने विचारला प्रश्न
भारती व्हिडीओच्या सुरूवातीलाच म्हणजे,'या, आत या... 'पुढे भारती हात जोडून सगळ्यांचे आभार मानते... 'मला पण मतदान करा...' त्याचवेळी एक फोटोग्राफर तिला प्रश्न विचारतो. पण तो व्हिडीओत नीट ऐकू येत नाही. पण तो गरोदरपणाशी संबंधित असल्याच सांगण्यात येतं.
तेव्हा भारती फोटोग्राफरला म्हणते, 'गरोदर आहे ही चूक केली का?' हा व्हिडीओ पापाराझी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इंस्टाग्रामवर पेजवर शेअर केली आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये भारती सिंहचा मजेदार स्वभाव व्यक्त होत आहे. भारतीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.